दवाखान्याच्या खर्चा पासून सुटका !!!!
आज सगळीकडे पाणी हवा काहीच स्वच्छ नाही. सगळीकडे प्रदूषण / रासायनिक शेती / आपली चुकीची जीवनशैली यामुळे अर्थातच आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांचे स्पीड यामुळे अपघात वाढत आहेत. दिवसागणिक दवाखान्याचा खर्च सुद्धा वाढत चालला आहे. समजा एखादा अपघात किंवा छोटे मोठे आजारपण आलं तर तुम्ही साठवलेले सर्व पैसे घेऊन जाते . यासर्वापासून सुटका हवी असेल तर आपला व आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा असलाच पाहिजे.
थोडक्यात माहिती
१. एकाच विम्यात पूर्ण कुटुंबाचे स्वरक्षण घेता येते.
२. कुटुंबातील कोणीही आजरी पडो तुम्ही जेवढा रक्कमेचा विमा घेतला आहे ( ३/५/१० लाख ) तेवढा खर्च मिळू शकतो.
३.आरोग्य विमा म्हणजे दवाखान्यात २४ तासा पेक्ष्या जास्त काळ ऍडमिट झाला तर त्याचा खर्च आपल्याला परत मिळतो.
४. विमा कंपन्यांनी दिलेल्या लिस्ट मधील दवाखाण्यात गेला तर पैसे न भरता उपचार सुरु होऊ शकतो. जर तुम्ही लिस्ट मधील दवाखाना सोडून दुसऱ्या दवाखान्यात गेला तर बिल देऊन मग पैसे परत घेता येतात.
५. जेव्हा आपल्याला कोणताही आजार नसतो त्याच वेळी आरोग्य विमा सहज मिळतो.
६ वार्षिक हप्ता वयावर आणि कुटुंबातील सदस्य यावर अवलंबून असतो.
आपण आपल्या ५ /१० लाखाच्या गाडीचा विमा करतो. मग अमूल्य अशा आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा करणे आता तरी काळाची गरज आहे.
हेल्थ इन्शुरन्सची गरज नेमकी काय?
तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या खिशातून भली मोठी वैद्यकीय बिले भरण्याचा तुमचा ताण कमी करेल. तुम्ही मेहनतीने कमावले गेला पैसा वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याऐवजी तुमचे आयुष्य परिपूर्ण पद्धतीने जगण्यासाठी बचत करू शकता. तुम्हाला प्रीमियमच्या दरांची काळजी असेल तर अत्यंत परवडणाऱ्या प्रीमियम दरात तुम्हाला पुरेशा प्रमाणात आरोग्यविमा सुविधा मिळेल याची खात्री बाळगा. तुम्हाला कौटुंबिक सवलतीसारख्या विविध सवलतीही मिळतील. त्यामुळे तुम्हाला तुलनेने कमी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम भरत असताना तुमच्या मेडिकल इन्शुरन्स प्लॅनचे कव्हरेज कायम ठेवण्यास मदत होईल.
तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार करून घ्यायचे ठरवल्यास तुम्हाला कॅशलेस क्लेम आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा यांचे फायदे मिळू शकतील. एक नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे असे हॉस्पिटल ज्याचा तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीसोबत करार आहे, जे तुम्हाला तुमच्या खिशाला भोक न पाडता सर्वोत्तम उपचार मिळवण्यासाठी मदत करते.
भारतात तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी तुम्ही करत असलेल्या रकमेचे प्रदान प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर वजावटीसाठी पात्र आहेत. तुम्ही स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी केल्यास आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास कमाल 1 लाख रूपयांपर्यंत कमाल वजावट मिळवू शकता.
भारतातील हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स तुम्हाला फक्त हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठीच कव्हर करत नाहीत तर गंभीर आजार, अपघातासंबंधी, मातृत्व, सल्ला, तपासणी आणि अशा इतर वैद्यकीय खर्चांसाठी विविध प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सद्वारे कव्हर करतात.
तुम्ही आर्थिक बाबतीत सुरक्षित असाल तर रूग्णालयात दाखल व्हावे लागले तरी तुम्हाला फार ताण येणार नाही. एका तणावपूर्ण परिस्थितीत तुम्हाला शांत राहण्यासाठी वैद्यकीय इन्शुरन्स असल्याचा फायदा मिळतो.