टर्म प्लान म्हणजे काय ?
“इन्शुरन्स” हि संकल्पनाच मुळात अस्तित्वात आली, भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी.
थोडक्यात माहिती
१. विमा हि गुंतवणूक नव्हे.
२. समजा, एखाद्या कुटुंबातील कमावता व्यक्ती मृत्यु पावला तर त्याच्या मुलांचे शिक्षण, घराचे/ गाडीचे कर्जाचे हप्ते याची जबादारी कोण घेणार ? यासाठी असतो विमा.
३.महत्वाचे म्हणजे ४-५ लाखाचा विमा घेतला असेल तर वरील जबाबदरी ४-५ लाखामध्ये पूर्ण होतील का?
४. या साठी आपल्याला हवा आहे कमी हप्ता आणि मोठी रक्कम असेल असा विमा , जसे की ५० लाख किवा १ करोड.
५. टर्म प्लान चे गणित केले तर बघा….
उदा.
एक व्यक्ती आहे जो महिना ३०००/- भरून असा विमा घेतो ज्या मध्ये पैसे परत मिळतात, या प्लान मध्ये ,काहीच नाही झाले तर २० वर्ष्यानी या व्यक्तीला १० ते १२ लाख मिळतील. आणि दुर्घटना झाली तर ३ ते ५ लाख भेटतील.
दुसरा व्यक्ती आहे जो, महिना ३०००/- मधील १०००/- चा टर्म प्लान घेतो ,आणि राहिलेले २०००/- हे १२ % व्याज देणाऱ्या गोष्टी मध्ये गुंतवतो या व्यक्तीची दुर्घटना झाली तर कोट्यावधी रुपये मिळतील, ज्या मध्ये पूर्ण कुटुंब सुरक्षित राहील. गुंतवलेल्या २००० मधून, २० वर्ष्यानी, २० लाख मिळतील.
दोन्ही मध्ये दुसरा व्यक्ती सरस आहे.