|| जो जे वांछील तो ते लाहो || प्राणिजात !
शाळेत असताना अभ्यासात चांगला होतो. म्हणून मी पुढे इंजिनीरिंग केली, देश-विदेशातील मोठ्या कंपनीत नोकरी केली. पण २० वर्षांचा असल्यापासून मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी मला प्रकर्षाने जाणवायचे आपण ६० व्या वर्षी सेवा निवृती घेऊन ,मला आवडणारा व्यवसाय किंवा आवडणारा छंद कधी जोपासणार ?माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी म्हणून पुस्तके वाचण्यास सुरवात केली. “शोधा म्हणजे सापडेल , मागा म्हणजे मिळेल “ या म्हणी प्रमाणे मला १५ वर्षांत सेवा निवृत्त होण्याचा मंत्र मिळाला मी तो आमलात आणायला सुरवात केली आणि वयाच्या ३५ व्या वर्षी मला “आर्थिक स्वातंत्र्य “ भेटले. नोकरीतून बाहेर पडलो. आज विविध व्यवसायातून थोडे फार लक्ष्य देऊन इनकम येत आहे. मी आज आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे.
जे केलं ते सांगितलं आता हेच व्हिजन आहे कि,ज्या गोष्टीमुळे मी माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थेर्य देऊ शकलो तेच लोकांपर्यंत पोचवायचे. लोकांना सुद्धा असे करता आले पाहिजे. लोकांना ही आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. फक्त पैशासाठी न जगता आयुष्य आनंदात गेले पाहिजे म्हणूनच हाच मंत्र लोकांनां वेगवेगळ्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
आत्तापर्यंत “ श्रानु वेल्थ “ च्या माध्यमातून आम्ही २००० हून अधिक लोकांनां आर्थिक नियोजनाचे चे धडे दिले आहेत.पैश्याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन देत आहोत. आज ते सर्वजण आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकडे झेप घेत आहेत.
आपण हे मान्य करायलाच हवे कि सर्व गोष्टी एकाच ठिकाणी येऊन थाांबतात ती म्हणजे पैसा . आजच्या काळात पैशाविना कोणतीही गोष्ट सहजासहजी शक्य होत नाही.आपल्याकडे मुबलक पैसा असेल तर आपल्या मुलाांचे शिक्षण,आपल्या आवडी निवडी,आपल्याला आवडणारा उद्योग व्यवसाय आणि खूप काही करू शकतो. काहीही म्हटले तरी पैशाविना जीवन नाही, पण याच पैशाचे शिक्षण देणारी कुठेही संस्था नाही किंवा आपणही आपल्या मुलाांना त्या बद्दल सजग करत नाही. आर्थिक नियोजन शिकवणारी शाळा हि काळाची गरज झाली आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्रानुवेल्थ या संस्थेची निर्मिती झाली.
“श्रानुवेल्थ” च्या माध्यमातून आम्ही लोकांचा फायदा करून देणारी, सरकारी नियंत्रणात असणारी आणि महागाई पेक्ष्या लोकाांना पुढे घेऊन जाणारी अश्या योजना लोकांपर्यंत पोहचवत आहे.आज लोकाांना इन्शुरन्स करताना व तो केल्यानांतर खूप साऱ्या गोष्टी लपवल्या जातात, त्या पासून त्याांना सावध करणे व लोकांचा उद्देश सार्थ होईल असे विमा आणि आर्थिक प्रोडक्ट लोकाांना सुचवत आहे . “श्रानुवेल्थ” लोकाांना योग्य सल्ला मिळायला हवा म्हणून प्रयत्नशील आहे.
आज पर्यंत शेकडो लोकाांना श्रानुवेल्थ च्या माध्यमातून मोटर / हेल्थ /लाइफ क्लेम मिळवून दिला आहे. त्याांना त्याच्या अडचणीच्या काळात योग्य इन्शुरन्सच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे, तसेच हजारो लोकाांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.