म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
म्युचुअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांच्याकडे पैसेही असतात मात्र त्याना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणूककीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेकनिकल एनेलीसीस व फंडामेंटल एनेलीसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्याच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणूकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा एकटे नसता. जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनते गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोडो रुपये) त्या योजनेत जमा होत असतात. यामुळे फंड मॅनेजरला अनेक विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळे दीर्घ मुदतीमध्ये म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेले आहे.
तेजी मंदी हा शेअरबाजाराचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तो वरच जात असतो. एक लक्षात ठेवा कि सेन्सेक १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ रोजी ३७००० झाला. गेल्या ३८ वर्षांत सेन्सेक्स ने वार्षिक १५ % चक्रवाढ दराने परतावा ठदलेला आहे.
म्युचुअल फंड फायदे
महागाई पेक्षा जास्त परतावा
साठवलेली रक्कम कर मुक्त मिळते
छोटी रक्कम सुद्धा गुंतवता येते
कधीही रक्कम काढण्याची मुभा
कर सवलत घेता येते
SIP म्हणजे काय ?
ठराविक रक्कम ठराविक मुदतीने ठराविक काळाने गुंतवणे (रिकरिंग डिपोझिट प्रमाणे) यास नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP) असे म्हणतात. बाजारातील चढ उताराप्रमाणे युनिटचे निव्वळ मालमत्तामूल्य (NAV) कमी अधिक होत असते. यामध्ये NAV कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे युनिटचे सरासरी मूल्याने (Rupee Cost Averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो. जर NAV कमी असेल तर जास्त युनिट येतील तर NAV जास्त असेल तर कमी युनिट येतील.
मोठ्या कालखंडात जमा झालेले युनिटवर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारी रक्कम आणि जमा मूद्दल यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होवून जोखिम तीव्रता कमी होवू शकते
ज्यांची मुच्युअल फंड मध्ये गुंतवणूक आहे त्या लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो सिप (SIP कि एक रक्कमी ) ?
- शक्यतो बाजारातील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी आपण SIP ( सिप ) चा मार्ग निवडतो.
- जर आपले वय ३५ च्या आतील असेल तर SIP हा उत्तम मार्ग आहे, त्या मध्ये थोडी थोडी रक्कम करत तुमची रक्कम हि वाढते आणि पुरेसा कालावधी असल्यामुळे चक्रवाढ या पद्धतीने व्याज पकडून रक्कम खूप मोठी होते.
- खालील उदाहरण पहा यांनी सरासरी किती परतावा ( % ) मिळवला आहे,
- पण जर ३५ वय होऊन गेले असेल तर योग्य आर्थिक सल्लागाराच्या मदतीने तुम्ही कमी वेळात जास्त परतावा मिळवण्यासाठी एक रक्कमी रक्कम सुरुवातील फिक्स परतावा देणाऱ्या फंड मध्ये ठेऊन नंतर मार्केट मधील उतार पाहून थोडी थोडी गुंतवणूक करू शकता.
सध्या म्युच्युंअल फंड मधील लाभांश (Dividant ) वरती कर बसत असल्यामुळे सरळ लाभांश न घेता ( SWP) च्या मार्गाने दर महिना पैसे घेतलेले बरे. या सर्व टर्म समजण्यासाठी नक्की आम्हाला कॉल करा ( 7219717199 )